पोस्ट्स

ऑगस्ट, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

*फकिरातील जातीय सलोख्याचे दर्शन*

इमेज
मराठी साहित्यात  अण्णा भाऊ साठे  यांचे योगदान खूप मोठे आहे. त्यांच्या केवळ मराठी कादंबरीची संख्या पस्तीस आहे. ‘ फकिरा ‘कादंबरीत मानवी कल्याणाचा मूलभूत प्रश्न मांडला आहे. ‘त्यानी परिस्थितीचे दारिद्रय अनुभवले होते. परंतु त्यांच्याकडे वैचारिक दारिद्रय कधीच नव्हते. मनाने श्रीमंत असणाऱ्या अण्णा भाऊंनी समाजातील विविध प्रश्नावर बोट ठेवून परिवर्तनाची दिशा दाखवली आहे. ‘फकिरा’कादंबरीतून एक वैश्विक स्वरूपाचे बंधूभाव अधोरेखित झाला आहे. त्यांच्या एकूण साहित्यास वैचारिक अधिष्टान असल्यानेच या कादंबरीला 1961 मध्ये महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट पुरस्कार प्राप्त झाला आहे.या कादंबरीकडे विविध दृष्टिकोणातून पाहता येते. ग्रामव्यवस्थेतील जातीय सलोखा आणि माणूसकीचे अत्यंत दुर्मिळ दर्शन‘फकिरा’कादंबरीचामुख्य गाभा आहे. माणसाला माणूसपण देवून जाती शिवाय माणूस एकत्र बांधण्याचे सूत्र या कादंबरीत आहे. व्यक्ती, गट, समाज, गाव, यामध्ये जातीय एकोपा निर्माण करणारा धागा कादंबरीच्या कथानकातून गुंफला आहे. या अंगाने गावगाडयातील बंधूत्वाचे चित्रण पहाता येते. अण्णाभाऊंचे  लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्टया कृतिशीलतेवर आध...